प्रतिनिधी , मुंबई : यूपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोने दिली आहे. कुठल्याही कारणाने यूपीएससीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला तर त्याची माहिती यूपीएससीच्या वेबसाईटवर देण्यात येईल, असे प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोने कळवले आहे.
