प्रतिनिधी , मुंबई : येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचं उद्घाटन करतील. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचं खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
