जनतेज न्युज

रक्त संकलन वाहनाचे लोकार्पण, ग्रामीण भागात जाऊन करणार रक्त संकलन…

प्रतिनिधी , यवतमाळ : वनविकास महामंडळ यांच्या कडून देण्यात आलेल्या 24 लाख रुपये किमतीच्या रक्तसंकलन वाहनाचा लोकार्पण सोहळा आज वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्यासह एफ.डी.सी.एम अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्याकडे रक्त संकलन वहिनी सोपविण्यात आली.
यावेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात रक्तदाते मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागात जाऊन या वाहनाद्वारे रक्त संकलन करण्यात येणार आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज असे, हे वाहन आहे. यावेळी रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.