प्रतिनिधी, रत्नागिरी : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकासआघाडी आक्रमक झाली असून राज्यभर त्याचे पडसाद पहायला मिळत आहेत. भाजप विरोधात महाविकासआघाडीतील सर्वच पक्ष एकत्र आलेत. रत्नागिरीत देखील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते यांनी काँग्रेस भवन येथे एकत्र येत. भाजप सरकारचा निषेध नोंदवला. मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी म.वि.आ.च्या कार्यकर्त्यांनी केला.
