प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पुढाकारातून पोलीस पाल्य व गरजू घटकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस कल्याण नोकरी मेळाव्यात साधारणपणे 650 तरुणांना जॉब मिळाला असून , त्याबाबतचे नियुक्तीपत्राचेही वाटप करण्यात आले.पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव , पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सूर्यकांत पाटील , राम सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्यात पोलीस पाल्य , अनाथ मुले , ऑपरेशन परिवर्तन गटातील उमेदवार व पारधी समाजबांधव उपस्थित होते.यात मुलांबरोबरच मुलींचीही संख्या सर्वाधिक होती.२८ कंपन्यांचा सहभाग पोलीस पाल्य व गरजू घटकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस कल्याण नोकरी मेळाव्यात सोलापूरबरोबरच बाहेरील जिल्ह्यातील अशा विविध 28 कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता.या सर्वांची योग्य पद्धतीने व्यवस्था ग्रामीण पोलिसांनी केली होती.
