जनतेज न्युज

नवाब मलिक यांच्या समर्थनात महाविकास आघाडीचे आंदोलन.

प्रतिनिधी, सांगली : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने जी कारवाई केली.याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये महाविकास आघाडीतर्फे सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये गांधी पुतळ्याच्या समोर नवाब मलिक यांच्या समर्थनात आंदोलन केले.यावेळी या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.तर यावेळी भाजपचा विरोध घोषणाबाजी करण्यात आली.झुकेगे नही लढेंगे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.