जनतेज न्युज

राष्ट्रवादी व महाविकास आघाडी पक्षातर्फे एक दिवसीय डफडे बजाओ आंदोलन

प्रतिनिधी, बुलडाणा : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मलिकांचे जोरदार समर्थन करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, काँग्रेस सेवादल चे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रासिंग चौव्हाण, यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.