जनतेज न्युज

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौकात महाविकास आघाडीचे केंद्र शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन

प्रतिनिधी, औरंगाबाद :  आज शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी  शहरातील क्रांती चौकात महाविकासआघाडी च्या वतीने केंद्रशासनाने भाजपाच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले आहे.मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली ची चित्रे शहरात दिसून आली आहे.यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, यांचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने क्रांती चौकात जमा झाले असून,

केंद्र शासना आणि भाजपाच्या विरोधात मोठ्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या असून,शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आंदोलन आज रोजी क्रांती चौकात संपन्न झाले असून,सदरील आंदोलनासाठी मोठा जनसमुदाय क्रांती चौकात जमा झाला होता,यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्ता आणि महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. केंद्र सरकार आणि भाजप शासकीय यंत्रणाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला असून,महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा पवित्रा भाजपच्या काही नेत्यांनी घेतला असून,खोटे आरोप करून ईडीची चौकशी लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपाचे नेते करीत आहे. मात्र आता महाविकास आघाडी सरकार कोणत्याही दबावाला घाबरणार नाही,

भाजप केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत असल्याचाही आरोप यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. नवाब मलिक यांची अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मोठे आंदोलन क्रांती चौकात संपन्न झाले आहे.यावेळी पोलिस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.महाविकास आघाडीच्या आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासन आणि भाजपाच्या विरोधात मोठ्या घोषणा यावेळी देण्यात आले आहे.सदरील आंदोलन आज रोजी संपन्न झाले.