जनतेज न्युज

रयत संकुल स्कूल विद्यार्थ्यांचे एन एम एम एस परीक्षांमध्ये विक्रमी यश

प्रतिनिधी , राहाता तालुक्यातील लोणी येथील संकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विक्रमी यश संपादन केले अशी माहिती प्राचार्य गमे सर यांनी आज दिली रयत संकुल विद्यालयाचे 25 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षा पास झाले असून प्रत्येक विद्यार्थ्याला 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे असे एकूण बारा लाख रुपयांची शिष्यवृत्ती रयत शिक्षण संकुल विद्यालयाला प्राप्त होणार असून एन एम एम एस परीक्षा मध्ये रस संकुल विद्यालयाचा उत्तर विभागात दुतिय क्रमांक तसेच अहमदनगर जिल्ह्यात त्यांचा तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे यामध्ये कुमारी ईश्वरी कडू हीचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला असून तसेच ओंकार आंधळे याचा तृतीय क्रमांक मधुरा शेळके चा सहावा व प्रणव विखे याचा नववा क्रमांक आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य गमे जी टी उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक स्पर्धा परीक्षेचे विभाग प्रमुख पलघडमल एस पी व सर्व मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका व सेवक वर्ग यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले आहेत