प्रतिनिधी ,सध्याच्या राजकारणात केवळ विरोध म्हणुन कसलीही शाह निशा न करता आरोप केले जात आहेत . राजकारणाची खालावलेली ही पातळी सर्वच राजकिय पक्षासाठी धोक्याच आहे . त्यामुळे सर्वच पक्षांनी आरोप करण्यापुर्वी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार करावा असे मत राज्याचे माजी वणमंत्री आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केले . श्री राठोड आज उस्मानाबादमध्ये गोर बंजारा संवाद मेळाव्यासाठी आले होते समाजाच्या विवीध २५ मागण्यांसाठी अॅल इंडियन गोर बंजारा समाज संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भर मेळावे सुरू आहेत .
