प्रतिनिधी , राज्यभरातील 5 हजाराहून अधिक निवासी डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज डॉक्टर संपावर आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयाबाहेर मार्डच्या निवासी डॉक्टरांचा संप सुरु केला आहे. जोपर्यंत, लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मार्ड डॉक्टर संपावर ठाम आहेत.
शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन अनेक महिने उलटले. तरीही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे मार्डचे डॉक्टर संतप्त आहेत. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
