प्रतिनिधी , जळगाव: चोपडा तालुक्यात सतत सुरू असलेला पाऊस यामुळे तालुक्यातील कापूस सोयाबीन कांदा मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र सरकारमधल्या मंत्री माध्यमांसमोर बोलताना पंचनाम्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर शासनाचा कुठलाच प्रतिनिधी अजून पर्यंत पंचनाम्यासाठी आला नसल्याने शेतकरी राजा मदतीच्या अपेक्षेत वाट पाहत आहे तात्काळ पंचनामे करून काहीतरी मदत मिळवून द्यावी ही अपेक्षा शेतकरी राजा करीत आहे.
