जनतेज न्युज

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे उच्चस्तरीय चौकशी होणार

प्रतिनिधि , औरंगाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज औरंगाबाद शहरामध्ये आले होते औरंगाबाद शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचनाही केल्या जर तुम्ही प्रामाणिकपणाने काम केले तर पक्षाला याचा फायदा नक्कीच होईल त्यामुळे वार्ड मध्ये बुत कमिट्या नेमावे आणि प्रत्येक वार्डमध्ये अध्यक्षाची नेमणूक करून तेथील कामे प्रामाणिकपणाने करावे. अशा सूचना कार्यकर्त्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

१) भंडारा येथील दुर्घटनेनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नवीन चौकशी समिती स्थापन केली असून त्यामध्ये आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली ही समिती दोन-तीन दिवसात अहवाल सादर करेल आणि दोषीवर कारवाई केली जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत म्हणाले
आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे यामध्ये फायर ऑडिट चे प्रशिक्षण दिले जाणार आहे