जनतेज न्युज

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही – गिरीश बापट

प्रतिनिधि , सातारा : राज्य सरकारने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून यावर भाजप नेते सडकून टीका करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नसून आमचा कार्यकर्ता हाच आमचा संरक्षक आहे. सरकारला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या आमच्या नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फौज आहे अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ते साताऱ्यात आले होते.