जनतेज न्युज

राज्यात सुडाचे राजकारण सूरू – माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा ठाकरे सरकारवर हल्ला

प्रतिनिधि , पंढरपूर : नक्षलवादी भागात राहून जनतेची सेवा करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारने झेड प्लस सुरक्षा कमी करून सुडाचे राजकारण सुरू केलं आहे, अशी टीका माजी मंत्री व भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी आज येथे केली.
आज ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था कमी करून फक्त व्हाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर माजी मंत्री लक्षण ढोबळे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत, ठाकरे सरकारने अयोध्येला जावून श्रीरामाचे दर्शन घ्यावे असा खोचक सल्ला ही ढोबळे यांनी ठाकरे सरकारला दिला.