जनतेज न्युज

राज्य महसूल कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून केल काम

प्रतिनिधी, राज्य महसूल कर्मचारी संघटना यांचे वतीने जाहीर करण्यात आलेल्या अंदोलनानुसार आज दिनांक 23.03.2022 रोजी औरंगाबाद जिल्हयातील सर्व महसूल कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम करणे हा आंदोलनाचा दुसरा टप्पा औरंगाबाद जिल्हयातील सर्व तालुक्यातील महसूल कर्मचारी यांच्यावतीने पार पाडण्यात आला आहे. तसेच यापुढील तिसरा टप्पा दिनांक 28.03.2022 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप व तद्नंतर चौथा टप्पा दिनांक 4.4.2022 पासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.आंदोलनाच्या प्रमुख मागण्या 1. सर्व महसूल सहायकाची पदे तात्काळ भरण्यात यावी.2. अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गामध्ये तात्काळ पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी.आज रोजीचे आंदोलन हे मा. श्री. परेश खोरसे, जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.