जनतेज न्युज

रामटेकडी कचरा प्रकल्प हटवण्यासाठी नगरसेवकाकडून महापौर कार्यालयात आणला कचरा..

प्रतिनिधी , पुणे : निवेदन देण्यासाठी नगरसेवक योगेश ससाणे, आणी कांबळे यांना महापौर कार्यालया बाहेर, ताटकळत उभे राहावे लागले या वेळी सुरक्षा रक्षका कडून नगरसेवकांची अडवणूक करण्यात आली.
रामटेकडी येथील कचराप्रकल्प हटवण्यासाठी स्थानिक नागरिक आणी नगरसेवक यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही, पालिकेकडून कोणत्याही कारवाई होत नसल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक योगेश ससाणे, आणी कांबळे यांनी महापौर कार्यालयात कचरा आणुन अनोखा निषेध नोंदवला
या वेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या नाग4सेवक स्थानिक नागरिक, व्यावसायिक यांचीपालिकेच्या सुरक्षा रक्षका कडून अडवणूक करण्यात आली, तर महापौर हे कोणत्या गुप्त बैठक कित व्यस्थ आहेत, जे नागरिकांच्या समस्येपक्ष महत्वाची आहे असे म्हणत योगेश ससाणे यांनी महापौर यांच्या कार्यालयाचे दरवाजे ठोठवले