प्रतिनिधी , दिल्लीत कृषी विधेयक कायद्यां विरोधात आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं आहे.
सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मूर्ख मनुष्य आहे, ते हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी त्यांचं आधी (DNA) डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.
