प्रतिनिधी , जळगाव : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय संविधान बचाव समितीच्या वतीने आज भुसावळ रेल्वे स्टेशन वर गळफास लावून आंदोलन करण्यात आले , आज संविधान बचाव समिती व इतर 10संघटनाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली , शेतकऱ्यांच्या विरोधात बनवलेला कायदा त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनालाचे नेत्वृत्व पी आर पी चे जिल्हा अध्यक्ष जगन सोनवणे यांनी केले या वेळी इतर 10संघटनाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
