जनतेज न्युज

लातूर जिल्ह्यात 41 जेनेरिक मेडिकल, लाभार्थी मात्र मर्यादित

प्रतिनिधी , लातुर : सर्वसामान्य जनतेला कमी दरात औषधांचा पुरवठा व्हावा या अनुषंगाने दोन वर्षांपूर्वी जेनेरिक मेडिकल ची उभारणी करण्यात आली आहे.काळाच्या ओघात याबाबत जनजागृती होत असली तरी पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ झालेला नाही. त्यामुळे जनजागृती आणि खासगी डॉक्टरांनी रुग्णांच्या हिताचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
लातूर जिल्ह्यात 41 जेनेरिक मेडिकल उभारण्यात आली होती.आजही सर्व मेडिकल हे सुरू आहेत पण ग्राहकांची संख्या ही वाढत नाही. जेनेरिक औषधे हे इतर ब्रँडच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांनी कमी दरात मिळतात. पण कमी दराचे ते हलक्या प्रतीचे अशी भावना नागरिकांची आजही कायम आहे. पण दर्जामध्ये कोणतीही कमी नाही त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ज्यांची परस्थिती हालकीची आहे त्यांनी या जेनेरिक मेडिकलचा लाभ घेणे आवश्यक आहे.तर खासगी डॉक्टरांनीही केवळ खासगी मेडिकलमधीलच आणि ब्रँड असलेलेलीच औषधे घेण्याचे बंधन करू नये. या दोन्ही बाबींची अंमलबजावणी झाली तर जेनेरीक मेडिकल खऱ्या अर्थाने जनरल लोकांसाठी उपलब्ध होतील हे नक्की