प्रतिनिधी, कल्याण :
रिक्षावर लावण्यात आलेल्या एबीपी वेडिंगच्या बॅनर मुळे हत्येच्या गुन्ह्यातील दोन आरोपीला अवघ्या १२ तासात अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलंय.डोंबिवली एम आय डी सी परिसरात विजय पेपर मिल या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती .कंपनीतील सामान चोरीला गेल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी असा संशय पोलिसांना होता. तपासाचा हाच धागा पकडत पोलिसांना परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले त्यांना एक रिक्षा संशयास्पद आढळली. याच रिक्षावर एबीपी वेडिंगचा बॅनर होता. मानपाडा पोलिसानी अवघ्या आठ तासात ही रिक्षा शोधून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी टोनी थॉमस डिसिल्वा उर्फ शिवा सोमा हीलंम याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेला दीड लाख किमतीचा मुद्देमाल रिक्षा हस्तगत केली. मयत सुरक्षा रक्षकाने चोरी करण्यात विरोध केल्याने आपल्या दोन साथीदारांसह त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप ने प्रहार करत त्याची हत्या केल्याची कबुली टोनी ने दिली आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील विजय पेपरमिल या बंद असलेल्या कंपनीमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.ज्ञानबहादुर गुरुम अस या मयत सुरक्षा रक्षकाच नाव होत .मृतदेहाच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने प्रहार केल्याच्या खुणा होत्या .तसेच कंपनीतील भांगरतील सामानहि चोरी झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले . मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने घटनेचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. एका सीसीटिव्ही मध्ये बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास काही इसम एक रिक्षात काही सामान घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता मात्र रिक्षावर एबीपी वेडिंग बॅनर लागलेला होता. पोलिसांचा या रिक्षांवर संशय बळावला. याच बॅनर च्या आधारे मानपाडा पोलिसांच्या पथकाने या रिक्षा चा शोध सुरू केला. या परिसरातील सर्व रिक्षांचा तपासणी करण्यात आली. या दरम्यान एका रिक्षावर सदरचा बॅनर कापलेला असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. पोलिसांनीही रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा ड्रायव्हर ने पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला,पोलिसांनी पाठलाग करत या रिक्षाचालकाला पकडले त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपल्या दोन साथीदारांसह या सुरक्षारक्षकाची हत्या केल्याची कबुली दिली १५ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास टोनी उर्फ शिवा हा आपल्या दोन साथीदारांसह ऑटोरिक्षातून विजय पेपर मिल कंपनी जवळ गेला होता. कंपनीत प्रवेश करतात याने कंपनीचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न केला. याच वेळेस सुरक्षारक्षक ज्ञान बहादुर जाग आली. त्याने आरडाओरड करत विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या टोनी व त्याच्या दोन साथीदारांनी एका लोखंडी रॉडने ज्ञानबहादुर याच्या डोक्यात मारून त्याची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर या तिघांनी कंपनीमधील कासा तांबे पितळ व इतर भंगाराचे तुकडे असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
