जनतेज न्युज

रिक्षा चालकाकडून प्रवाशाची लूट केडीएमसीच्या सीसीटीव्हीने फोडले लूटारुंचे बिंग रिक्षाच्या हूडचा रंग युनिक असल्याने आरोपाचा लागला सुगावा

प्रतिनिधी , प्रवासी रिक्षाच्या प्रतिक्षेत उभा होता. रिक्षा आली. त्या रिक्षात प्रवासी बसला. रिक्षा थोडय़ा अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि रिक्षात बसलेल्या सह प्रवाशाने त्या प्रवाशाकडील महागडा मोबाईल आणि रोकड लूटन रिक्षाच्या बाहेर ढकलून दिले. मात्र केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीसीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली आहे. रिक्षाचा हूडचा रंग युनिक असल्याने पोलिसांनी 16 तासाच्या आत प्रवाशाला लुटणा:या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारास बेडय़ा ठोकल्या आहेत.

आकाश जैयस्वाल नावाचा एक कारपेंटर कल्याण पश्चिमेत त्याचे काम संपवून निक्कीनगर परिसरातील चौकात उभा होता. रात्री साडे आठ वाजले होते. त्याला कल्याण स्टेशनला जायचे होते. तो रिक्षाच्या प्रतिक्षेत होता. यावेळी एक रिक्षा त्याच्या समोर आली. रिक्षा चालकाने आकाश याला विचारले स्टेशनला जायचे आहे का त्यावेळी आकाशने रिक्षा चालकास हो म्हटले. तो रिक्षात बसला. या रिक्षात आधीच एक प्रवासी बसला होता. रिक्षा थोडय़ा अंतरावर गेली तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला निजर्न स्थळी घेऊन गेला. आकाश जवळली महागडा मोबाईल आणि रोकड घेऊन रिक्षा चालक आणि सह प्रवासी पसार झाले. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या सीटीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली होती. रिक्षाचा पडदा हा निळ्य़ा रंगाचा होता. कल्याण डोंबिवलीत अशी रिक्षा कधी दिसली नाही. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी योगेश गायकर यांच्या पथकाने या रिक्षाचा शोध सुरु केला. अखेर ही रिक्षा सापडली. 16 तासाच्या आत आकाश जायस्वालला लुटणा:या रिक्षा चालक अक्षय कांबळे आणि सह प्रवासी रशीद शेख या दोघांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. हे दोघे कल्याण पूर्व भागातील श्रीकृष्ण नगर परिसरात राहणारे आहेत. प्रवाशाला लुटणा:या या दोघांचे बिंग फुटले आहे.