प्रतिनिधी , महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताहेत. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांच्यावर टीका करीत आहे. विदर्भाच्या अमरावती देखील अनेकांची घरे पडली आहे. अनेक शेतकरी वाहून गेलेत. पिकांचं देखील नुकसान झालंय तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौरा केला नाही. अमरावतीच्या मेळघाट परिसरात गेल्या ३ महिन्यात ४९ बालमृत्यू झालेत.. याकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भ दौरा करायला लावा अस आव्हाहन केलंय.
