प्रतिनिधी ,रायगड – महाड-पंढरपूर रस्त्यावर आकले गावाजवळ खाजगी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर महाडच्या खाजगी रुग्णालयात तसेच एम. एम. ए. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
महाडच्या खरवली गावातून ही बस कोल्हापूरकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघाली होती. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला. बसमध्ये 35 प्रवासी होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. चालकाच्या हलगर्जीमुळे हा अपघात झाला असून तो नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.
