जनतेज न्युज

सरसकट पिक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

सरसकट पिक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या

हिंगोली जिल्ह्यात खरीपाच्या हंगामात सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले, परंतु पीक विमा कंपन्यांनी बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा दिला नाही. तर काही शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम विमा परताव्यापोटी मिळाल्या.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा द्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या देण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी व संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता आणि प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास दोन तासांहून अधिक वेळ स्वाभिमानीचे कार्यकर्ते कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले होते.