कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आज कणकवली मुडेश्वर मैदान ते प्रांत कार्यालयापर्यंत आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतुन भाजपने ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, आमदार नितेश, माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे मोर्चाच्या अग्रस्थानी होते.
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार,अजित गोगटे उपस्थित होते
