प्रतिनिधी ,धुळे शहरामध्ये वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या भाजीपाला विक्रेता त्याचबरोबर रस्त्यात थांबा नसताना देखील कुठेही रिक्षा उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांना तसेच रस्त्यात कुठेही पार्किंग करणाऱ्या दुचाकी चालकां विरोधामध्ये धुळे शहर वाहतूक पोलीस प्रशासन आक्रमक झालेले बघावयास मिळत आहे.
धुळे शहरामध्ये आज विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांतर्फे 25 ते 30 रिक्षा जमा करण्यात आल्या आहे. धुळे शहराच्या विविध ठिकाणी चुकीच्या मार्गाने रस्त्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न मध्ये असलेल्या मुजोर रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या रिक्षाचालकांवर देखील कारवाईचा बडगा पोलिसांतर्फे करण्यात आला आहे.
धुळे शहर वाहतूक शाखेचा कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात अशा मुजोर रिक्षाचालकांवर दंडात्मक त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्यासाठी रिक्षा जमा करण्यात आलेल्या बघावयास मिळत आहे. यामुळे धुळे शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळणार आहे.
