जनतेज न्युज

सुप्रिया सुळे कचरा प्रकल्पवर भेट देण्यासाठी सकाळीच आंबेगावमध्ये

प्रतिनिधी , आंबेगाव बुद्रुक येथील पुणे महानगरपालिकेने नव्याने उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. काही दिवसांपूर्वीच आंबेगाव परिसरातील संतप्त नागरिकांनी परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने प्रकल्पला आग लावली होती आंबेगाव बुद्रुक ,आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी ,शनि नगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी, चव्हाण नगर, दळवी नगर.परिसरात दुर्गंधी पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.याच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने काही अज्ञात संतप्त नागरिकांनी हाच कचरा प्रकल्प पेटवून दिल्याची घटना घडली होती, याचा अनुषंगाने आज खासदार सुप्रिया सुळे यांनी कचरा प्रकल्पात दिलेली भेट दिली.यावेळी स्थानिक नगरसेवक व गावकरी उपस्थित होते .