जनतेज न्युज

लाल कांद्याचा भाव उतरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता.

प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यात सध्या लाल कांदा काढणीला सुरुवात झालेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याच्या भाव कमी कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी मार्केट मध्ये लाल कांद्याचे भाव चाळीस ते पन्नास रुपये किलोने विकला जात होता. त्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले होतं परंतु सध्या कांद्याचा भावात दिवसेंदिवस कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे लागलेला खर्च तो देखील निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला कुठेतरी भाव मिळेल यासाठी शेजारी राज्य मध्य प्रदेश येथे कांदा घेऊन विक्री करीत आहे. कांद्याला 15 ते 20 रुपये भाव मिळावा तरच शेतकऱ्याला कुठेतरी समाधान मिळेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.