प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव बोदवड रस्त्यावरती आज रस्ता रोको करण्यात आला. नॅशनल हायवे क्रमांक 6 चे काम सुरू आहे याकरता लागणारे राख, मुरूम वरणगाव शहरातून वाहतूक केली जात आहे त्यामुळे शहरातील स्टेशन रोड ची पूर्ण चाळण झाली आहे रस्त्यावरती मोठमोठे खड्डे या वाहतुकीमुळे पडले आहेत, टिपर मधून राख वाहतूक केली जात असल्यामुळे ही राख रस्त्यावरती पडत आहे त्यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्ता रोको करून टिपर धारकांना वाहतूक करण्यास मज्जाव केला आहे यामुळे वरणगाव बोदवड रोडवर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
