प्रतिनिधी , नागपूर : एकीकडे आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करत मोर्चे काढण्यात आले तर दुसरीकडे नागपूरात याच विषयाला धरून विदर्भवादी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-कामठी कामठी मार्गावर असलेल्या विजेच्या उपकेंद्रवर धडक मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थिती होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात करताच आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी सर्व विदर्भवादी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन शांत झाले
विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे गेल्या काही महिन्यांपासून वाढीव वीज बिलांच्या विरोधात सातत्याने आंदोलनं केली जात आहेत. आज देखील विदर्भावाद्यांनी पॉवर ग्रीड समोर आंदोलन सुरू केलं,ज्यामुळे पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला होता. आजच्या आंदोलनात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण सर्वाधिक होते.
वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी या आधी सुद्धा झाले आहेत आंदोलन
भारतीय जनता पक्षाने वाढीव वीज बिलांची मुद्दा हाताशी धरून आंदोलनांना सुरवात केली होती,त्यानंतर अनेक संघटना या विषयावरून आक्रमक झाल्या आहेत. दरण्यां दोन महिन्यांपूर्वी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तर ऊर्जामंत्री नितीन राऊत व मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांचे पुतळे देखील जाळले होते.कोरोना काळातील सर्व विदर्भातील जनतेला विज बिलातून मुक्त करा ही मागणी विदर्भवादी लावून धरत आहेत. कोरोना काळात सर्व जनता घरी थांबली असता, महावितरण व्दारे अव्वाचे सव्वा विजेचे बिल पाठवण्यात आले आहे. आज पोट कस भरायच हा प्रश्न निर्माण झाला असतांना ऊर्जा मंत्रायलाने पाठवलेलं वाढीव विजेचे बिल तरी कसे भरणार असा प्रश्न विदर्भावाद्यांनी उपस्थित केला आहे.
