जनतेज न्युज

वाढीव वीज बिल संधर्भात मनसे आज आक्रमक झाली

प्रतिनिधी , ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे ला मोर्चा साठी ठाणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र तरी सुद्धा मंसैनिक रस्त्यावर उतरून पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेत तोडून मोर्चाला सुरवात केली..या मोर्चा दरम्यान मनसैनिकत आणि पोलिसात बाचाबाची आणि धक्का बुक्की देखील झाली.आणि अखेर 144 कलम जमाव बंदी आणि 149 नोटिसा प्रमाणे मनसे कायदा हातात घेतल्यामुळे अखेर काही अंतरावर पोलीसानी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव,मनसे नेते अभिजित पानसे ,ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे सह अनेक महिला पुरुष पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून पोलिस वन मध्ये भरले.यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली…
मनसेने काढलेल्या विराट मोर्च्याला आज पोलिसांनी अडवल्याने मोठा वादंग माजल्याचे आज ठाण्यात चित्र पहायला मिळाले. लॉकडाऊन काळात सामान्यांना आलेल्या भरमसाट वीजबिलांविरोधात मनसेने दंड थोपटले असून आज ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत एका विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो मनसैनिक आणि सामान्य ठाणेकर सदर मोर्च्यात सामील झाल्याने रस्ते मनसेच्या झेंड्यानी फुलून गेले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना कालच 149 अंतर्गत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कारण देत या मोर्च्याला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही नागरिकांच्या हितासाठी मनसेने हा मोर्चा आपल्या नौपाडा कार्यालय येथुन काढलाच आणि मोर्चेकरी बरेकेट तोडून बाहेर पडले.यावेळी पोलिसात आणि कार्यकर्त्यांनमध्ये बाचा बाची देखील झाली.. पोलिसांनी त्याला अडवत जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सहा प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला नागरिकांच्या समस्यांचे सुवेरसुतक नसून गरिबांचे खिसे रिकामे केले जात आहेत असे जाधव म्हणाले. आधीच रोजगार नाही त्यात ही वीजबिलांची रक्कम लोकांच्या माथी मारत सरकारने खेल चालवला असून मनसे याला सडेतोड उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला..अखेर शेकडो मोर्चे कराणानं पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन पोलिस व्हन मध्ये भरले…