जनतेज न्युज

पदवीधर शिक्षक निवडणुकीबाबत वैद्यकीय अधिकारी आणि आशा वर्कर यांना महापालिकेकडून प्रशिक्षण: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी , पुणे: 1 डिसेंबर रोजी होत असणाऱ्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेकडून मतदान केंद्रासाठी नियुक्त वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर आणि एएनएम यांना प्रशिक्षण देणेत आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मृती पाटील आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रशिक्षण दिले.
महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यांची जबाबदारी सांगली महापालिकेवर आहेत. या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वच्छतेबरोबर सर्व खबरदारी घेणेबाबतचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा आरोग्य विभागाला दिले आहे. या नियोजनानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर नियुक्त वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय स्टाफ तसेच आशा वर्कर यांची जबाबदारी काय असणार आहे. त्यांनी नेमके काय काम करायचे आहे. कोविड नियमांच्या संदर्भात कोणती काळजी आणि खबरदारी घ्यायची याबाबतची संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात आशा वर्कर यांची जबाबदारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांची जबाबदारी नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली. तसेच मतदानापूर्वी आणि नंतर नेमकी आपली जबाबदारी काय आहे याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी देत सर्वांच्या शंकांचे निरसन केले. निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये. काळजीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन सुद्धा उपायुक्त स्मृति पाटील आणि राहुल रोकडे यांनी केले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सांगली महापालिकेने मनपा क्षेत्रातील मतदान केंद्रासाठी 9 वैद्यकीय अधिकारी , 66 नर्स आणि आशा वर्कर आणि 4 राखीव तसेच 5 स्वच्छता आणि सॅनिटाईजेशन टीम सज्ज ठेवल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली.