जनतेज न्युज

विविध मागण्यासाठी कामगारांच्या संपाला प्रतिसाद

प्रतिनिधी, बुलडाणा: आयकर लागू नसलेल्या सर्व कुटंबाला दरमहा साडे सात हजार रुपयाची मदत
देण्यात यावी, सर्व गरजुना दरडोई मासिक दहा किलो मोफत धान्य देण्यात
यावे, शहरी भागात रोजगार हमी योजनेचा विस्तार करण्यात यावा, जुनी पेंशन
योजना लागू करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचार्याना शासकीय कर्मचार्याचा
दर्जा देवूून त्यांना दरमहा एकविस हजार रुपये मानधन देण्यात यावे,
अंगणवाडी कर्मचार्याना पेंशन लागू करून त्यामध्ये महागाई नुसार वाढ
करण्यात यावी, आशा व गट प्रवर्तकांना कायम सेवेत घेवून जिल्हा
परिषेदेच्या शेष फंडातून त्यांना दाेन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता
देण्यात यावा, यासह इतर मागण्यासाठी आज २६ नोव्हेंबर रोजी सिटू सलंग्न
कामगार संघटना कृती समितीच्या वतीने संपाची हाक दिली होती. या संपात
जिल्हाभरातील हजारो कामगार व अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.