जनतेज न्युज

वादळी वाऱ्यासह गारांचा तडाखा.. अवकाळी पाऊसाचा दमदार हजेरी..

प्रतिनिधी , सांगली : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले आहे.सांगली शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.तर मिरज तालुक्यातील पूर्व भागासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.तर दुसर्‍या बाजूला द्राक्ष शेतकरयांची चिंता वाढली असून द्राक्ष बरोबर बेदाणा उत्पादनाला फटका बसत आहे.

व्ही वो – सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी कायम आहे मंगळवारी दुपारनंतर सांगली-मिरज शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.सांगली आणि मिरज शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला आहे.
त्यामुळे शहरातल्या अनेक सखल रस्त्यांवर पाणी साचून राहिलं होतं.तर
अचानक पडलेल्या या पावसाने शहर वासीयांची चांगलीच दैना उडाली.
या पाऊसाने मोठ्या प्रमाणात हवेत गारवा निर्माण होऊन,उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना थोडासा दिलासा मिळाला आहे.तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस पडला आहे.मिरज तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे.मालगाव परिसरात तुफान गारपीट झाली आहे.त्यामुळे मिरज पूर्व भागातल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता भीती व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.बेदाणा आणि द्राक्ष उत्पादनाला या अवकाळी पावसाचा फटका बसत आहे.