प्रतिनिधी , पुणे : रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून दरवर्षी १ जानेवारी रोजी पेरणे गावातील भिमा कोरेगाव विजयरणस्तंभाजवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येते यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या अटी नियमांच्या अधीन राहून पंरपरा खंडीत होऊ नये म्हणून आँनलाईन स्वरूपात पहाटे ६ वाजत शौर्य पहाट हा भिमगीताचा कार्यक्रम त्यानंतर सकाळी ८ ते ११ वा. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिराताई आंबेडकर कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर रिपब्लिकन सेना सरसेनानी आंनदराज आंबेडकर यांच्या उपस्थितित समता सैनिक दलाची बँड पथकासह सैनिक सकाळी विजयरणस्तंभास परेड सलामी देत अभिवादन मानवंदना सोहळा संपन्न होईल तो कार्यक्रम झाल्यावर दिवसभराचा कार्यक्रमाची सुरुवात होती यंदा कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम आँनलाईन पध्दतीने विजयरणस्तंभावर होणार आहेत नागरिकांना ते घरी बसून सोशल मीडिया, टिव्ही चँनेलवर घरी बसून पाहता येतील यांचे नियोजन प्रशासन करणार आहे, गर्दीमुळे कोरोणा रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनी भिमा कोरेगाव अभिवादन मानवंदना कार्यक्रमास येऊ नये आसे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले
