प्रतिनिधी , सिंधुदुर्गातील : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या श्रेय्यवादा वरून नारायण राणे आणि शिवसेनेत कुरघोडी सुरू असतानाच आता
मनसेनेही यात उडी घेतली आहे.
मनसेचे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तर थेट चिपी विमानतळाला बाळासाहेबाचं नाव देऊन बाळासाहेबांचा सन्मान कमी करू नका अशी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून मागणी असल्याचं पञकार परीषदेत म्हटलं आहे.
गेली वीसवर्षे रखडलेला हा प्रकल्प सुरू झाला तरी किती दिवस चालेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे
त्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गाला बाळासाहेब ठाकरेचं नाव देऊन सन्मान करा अशी मागणी केली आहे.
