प्रतिनिधी , लातुरात : लातूरमधल्या एका अल्पवयीन मुलीचं एका अल्पवयीन मुलावर प्रेम होते . यातून त्यांनी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले . घरातून पळाल्या नंतर हि पिडीत मुलगी आपल्या प्रियकराच्या आईकडे रहायला गेली ,मात्र काही दिवसातच या आरोपी आईने त्या पिडीत मुलीला पैसे घेऊन चक्क कला केंद्राकडे पाठवले . मात्र पीडिता अल्पवयीन असल्याने तिला वापस पाठवण्यात आले . कला केंद्रातून परत आलेल्या या मुलीला पुन्हा अंबाजोगाईच्या एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेकडे ठेवण्यात आले . तिथे तिच्यावर पैसे देऊन दोघांनी बलात्कार केला . मुलीची प्रकृती बिघडल्याने पुन्हा या मुलीला तिच्या प्रियकराच्या आईच्या हवाली करण्यात आले . एव्ह्ड्यावरच तिचा छळ थांबला नाही तर तिला पुन्हा दुसऱ्या कला केंद्रात पाठवण्यात आले . अखेर पिडीत मुलीने पोलिसांना आपली हकीकत सांगितली आणि हि घटना समोर आली . पोलिसांनी आता या घटनेत सहा जणांना अटक केली आहे.
