प्रतिनिधी , पुणे : पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शहरातील रुग्ण संख्या कमी होऊनही वेळेचे नियम लादले जात असल्यानं व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे. टास्क फोर्स हा सरकारला घाबरावत असून व्यापाऱ्यांमुळे कुठले संक्रमण होते हे स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात आलीय. बाजारपेठा बंद ठेऊन सरकारला मदत केली आता व्यापाऱ्यांची परिस्थिती बिकट झालीय. कर्ज, कामगारांचे पगार आणि दुकान बंद ठेऊन आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे आता घंटानाद आंदोलन करून सरकारला जागे करण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी आंदोलन करत आहोत. १२ वाजता हे आंदोलन होईल एकूण संपूर्ण शहरात १५ मिनिटे हे आंदोलन असेल. सरकारने ऐकले नाहीतर ४ ऑगस्ट पासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडे ठेऊ अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतलीय.
