जनतेज न्युज

सातारा पालिकेने अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरड कोसळणाऱ्या भागाची केली पाहणी.. नागरिकांना दिला इशारा..

प्रतिनिधी , सातारा : सातारा जिल्ह्यात जोरदार पडणाऱ्या पावसाने डोंगरकडा कोसळून अनेक दुर्घटना झाल्या आहेत..अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे..सातारा शहरानजीक असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा काही भाग 2017 रोजी कोसळून अनेकांच्या घराचे नुकसान झाले होते.. पाटण,वाई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेकडून खबरदारी घेत किल्ला परिसरात राहणाऱ्या नागरिकांना इशारा देण्यात आला..यावेळी माचीपेठ,बोगदा,चारभिंत,पावर हाऊस येथे जाऊन पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट,उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि बांधकाम अभियंता छिद्रे यांनी पाहणी केली..