जनतेज न्युज

शरद पवारांनी दिलेल्या व्यक्तव्याकडे एक वडिलकीचा संदेश म्हणुन पाहावे – महेश तपासे

प्रतिनिधी , मुंबई : शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी यांच्या भाष्य केल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. “सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं,” असं सूचक ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी दिलेल्या व्यक्तव्याकडे एक वडिलकीचा संदेश म्हणुन पाहावे. त्यात काही राजकारण नाही. महाविकास आघाडी सरकार हे तिन्ही पक्षाच्या विचाराचं भक्कम सरकार आहे. बराक ओबामांनी लिहीलेल्या पुस्तकात त्यांनी राजकारणातील नेत्यांवर काही व्यक्तव्य केलं आणि यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला त्यामुळे हा काही राग नाही एक वडिलकीच्या नात्याने संदेश आहे त्याकडे तसं बघावं.