जनतेज न्युज

शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही असेच कृषि बिल तयार केलेले आहे – खासदार रक्षा खडसे

प्रतिनिधी , जळगाव : दिल्लीमध्ये कृषी बिलावरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे ,कुणीतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे ,त्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत, कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवलेले आहे, शेतकऱ्यांचे आंदोलन बंद व्हावे यासाठी कृषिमंत्री ही वारंवार बैठका घेत आहेत, शेतकऱ्यांच्या समजूत काढत आहेत, या कृषी बिलामुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे, शेतकऱ्यांचे नुकसान न होणार हे कृषी बिल आहे ,शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे ,अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे