प्रतिनिधी , मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखावरुन सध्या मोठा राजकीय वादंग रंगलाय.आजच्या सामनातून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय.याच अग्रलेखावर प्रतिक्रिया देत आ.राम कदम यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. ‘सामनामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत लिहत होते, तोपर्यंत सामना हे वर्तमानपत्र होतं. मात्र, आजचा सामना हा एका पक्षाची बदनामी करणे त्यांच्यावर टिका करणे एवढेच काम करत आहे.राम मंदिर, बाबरी मज्जिद, निकाल लागू नये याकरिता ज्या पक्षाने वकिलांची फौज तैनात केली होती, त्याच पक्षासोबत महाराष्ट्रात सत्तेसाठी शिवसेना त्यांच्यासोबत आहे. संविधानाची गोष्ट करणारे यांना जर एखादी नोटीस आली तर त्याला उत्तर द्यायला हवे, त्याला विरोध करण्याचे काय काम?. जर तुम्ही चूक नाही केली तर भीती कसली. परंतू त्यांच्या बोलण्यावरून असं कळते की कुठे तरी पाणी मुरत आहे. त्यामुळेच आता सामना स्व.बाळासाहेबांच्या नावाने त्याकाळी ओळखला जात होता, तो सामना आता फक्त जाहिराती करिता मर्यादित राहिला आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी सामना’च्या अग्रलेखानंतर शिवसेनेने केली आहे.
