प्रतिनिधी, यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शिवजयंती ही रोज साजरी झाली पाहिजे. आज तारखेनुसार शिव जयंती साजरी केली जात आहे. शिवसेना तिथीनुसार शिव जयंती साजरी करीत होते. मात्र, आता तारखेनुसार साजरी करीत असल्याचा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी शिवसेना नेतृत्वाला लगावला.
