जनतेज न्युज

शिवसैनिकांचे एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आंदोलन

प्रतिनिधी, पुणे : शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे 37 हून अधिक आमदार यांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे.त्यांच्या या बंडखोरी विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे षडयंत्र करत आहे त्या षडयंत्रावर मात करण्याची ताकद उद्धव ठाकरे यांना मिळावी यासाठी आज पुण्यात शिवसैनिकांच्या वतीने येरवडा येथील राम मंदिरात महाआरती करण्यात आली आहे.
आम्ही सर्व शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत काल,आज आणि उद्या ठामपणे उभे आहोत.त्याच्या विरोधात जे कोणी षडयंत्र करत आहे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांना ताकद मिळावी यासाठी आज आम्ही महाआरती केली आहे.अस यावेळी शिवसैनिकांनी म्हटल आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक होत ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आंदोलन करत आहे.