जनतेज न्युज

मोडकळीस आलेल्या झेडपीच्या शाळा टाकताहेत कात

प्रतिनिधी, वर्धा : ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शाळांवर आहे. या शाळांमधील काही वर्ग खोल्या कित्येक दिवसांपासून मोडकळीस आल्याने विद्यार्जनात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शाळेच्या विशेष दुरुस्तीकरिता आणि बांधकामाकरिता निधी प्राप्त झाल्याने आता मोडकळीस आलेल्या शाळांचेही रुपडे पालटायला लागले आहे. गेल्या तीन वर्षात १५४ शाळांमधील १६१ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले असून २३४ शाळांना भिंतींचे संरक्षण मिळाले आहे.