प्रतिनिधी, नागपूर : नागपुरात काँग्रेस ने आज मशाल मोर्चा काढला. गांधी परिवाराच्या वीरोधात ईडीची कारवाई, ती तातडीने थांबवावी ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा म्हणून ही रॅली काढण्यात आली. जर कारवाई थांवबावली नाही तर काँग्रेस मोठया प्रमाणात रस्त्यावर उतरेल असे ही म्हटले. संविधान चौकाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हा मोर्चा निघाला. हातात मशाली घेऊन ही मंडळी घोषणा देत संविधान चौक ते व्हेरायटी चौक अशी गेली.
