जनतेज न्युज

सिडको विरोधात प्रकल्पग्रस्थांचा एल्गार; दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह

प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आज सर्वपक्षीय कृती समितीतर्फे दि बा पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त सोडक घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई रायगड ठाणे व पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्थ या आंदोलनासाठी आले होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे आंदोलन महत्वाचे मानले जात होते. या आंदोलनाला भाजपच्या आमदारांची मोठी उपस्थिती होती ज्यामध्ये प्रशांत ठाकूर, गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होण्यासाठी आणखी 3 वर्षांचा कालावधी लागणार असून दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यासाठी सरकारला भाग पाडू असा निश्चय यावेळी करण्यात आला. यासोबतच दरवर्षी दिबांच्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन धगधगत ठेऊयात असा एल्गार यावेळी कृती समितीतर्फे करण्यात आला.