प्रतिनिधी, मुंबई : आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त नवी मुंबईतील वाशी येथील शिव विष्णू मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यासोबतच वज्रेश्वरी येथून पायी चालत कावड यात्रेकरू शिवलिंगावर जल चढविण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक शिव विष्णू मंदिरात आले आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भक्तांना दर्शन घेता आले नव्हते. मात्र यंदा सर्व निर्बंध उठवल्याने मोठ्या उत्साहात भक्तगण मंदिरात दर्शनासाठी येत असून भक्तिमय वातावरणात पहिला श्रावणी सोमवार साजरा करण्यात येतो.
