प्रतिनिधी, बीड : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केलीय. शहरातील महाराणा प्रताप चौकात हा निषेध करण्यात आला असून यावेळी भाजप विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे. संजय राऊतांवर करण्यात आलेली कारवाई हा अन्याय असल्याचं शिवसैनिकांनी म्हटले आहे. भाजप ईडीच्या माध्यमातून सेनेच्याच नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप करण्यात आला.
